Saturday, August 20, 2011

देवा..काय रे तुझी करणी..!!..

एक माणूस....मनात बसतो बघताक्षणी
च्यायला..!!..काय माणूस आहे..!!..
तोच माणूस....पचकन थुंकतो पुढच्याक्षणी
च्यायला..!!..काय माणूस आहे..!!..

एक मुलगी....छेडते मनाची तार
काय मुलगी आहे यार..!!..
तोच "यार" सांगतो - खेळते म्हणे ती भावनांशी
काय मुलगी आहे यार..!!..

एक माणूस....रग्गड पैसा....आलिशान गाडी
काय राव श्रीमंती..!!..
एक माणूस....दीन दुबळा..मात्र दिलेर अन दर्यादिल
ही खरी श्रीमंती..!!..

एक माणूस....त्याची कविता उत्कट
भेटतात त्याला सगळे लोक उद्धट
एक माणूस....चोरलेलं साहित्य
त्याचाच उदो उदो ....टोलेजंग अगत्य..

एक माणूस....सूट..बूट..रुबाब
रोज हॉटेलात जाऊन शाही कबाब
एक माणूस....घर नाही..दार नाही..
रोज रस्त्यावरचा वडा-पाव..

एक माणूस....स्वच्छ शुद्ध आचार विचार
नोकरी नाही..किंमत नाही..
बसलाय घरी
बेरोजगार..

एक माणूस....बदमाश..लफंगा..
पण भ्रष्ट राजकारण्याचा ताईत..
मोठी नोकरी..मालदार पार्टी..
हिंडतो फिरतो ऐटीत..

एक मुलगी....नजाकतीचा दर्या..
देवा..आजपासून तुझीच मनधरणी..
तीच मुलगी....तिला कॅन्सर....वेळ कमी..
देवा..काय रे तुझी करणी..!!..

पापणी चिंब भिजलेली !

काय वाटले, उगाच हसलो
खिडकीपाशी जाऊन बसलो
पुनव चंद्रमा, रात्र सुंदर
समय अवेळी कातर कातर....

पडू लागला पाउस सरसर
मनास म्हंटले तू ही पाझर
शीळ रुमानी ही ओठांवर
मला बिलगली माझी दिलबर....

गालांवरती गुलाब लाली
कोमल काया सजलेली
नजर मजवर रोखलेली
पापणी चिंब भिजलेली....