Tuesday, November 29, 2011

तिरपा तिरपा कटाक्ष नयनी
थेट काळजाला भेदून गेला
नजर स्पर्श हा मुख-चंद्राचा
शब्दर्या ही आटून गेला....

Monday, November 14, 2011

अस्तित्व !

कटो-यात शेवटचा तेलबिंदू आटेपर्यंत जळत राहणारी पणती
मिटत नाही तोवर मिणमिणत राहणारी
पाण्याचा टिपूस जरी पडला तरी शमणारा तो इवलुसा ज्योतभर उजेड
उजेडानच तिमिराला चिरडता येत हे ठासून सांगणारी....

किस्मत - बिस्मत असलीच कोणी
तर तिला पुढ्यात झुकवली पाहिजे
स्वत:च अस्तित्व सिद्ध करायला
अंतर्मनातील प्रेरणा कायम पेटती पाहिजे....

जीव वा पणती, काहीही असो
गरजेचं असतं संपेपर्यंत प्रकाशत राहणं
समुद्रात शिंपले अगणित असतील
पण कणखर मनगटात असतं
शिंपल्यातल्या रेतीच रुपांतर मोत्यामध्ये करणं....

Tuesday, October 4, 2011

Note: My first Hindi Poem.
Subject of d poem: the love was about to start but unfortunately she died due to some reason
and then he wrote down his feelings.

उन नशीली निगाहो मे
प्यार का साहिल रवां था |
नशे मे धुंद दरिया मे
डूब जाने को जी चाहता था |

दर्द - ए - दिल का आलम
उन्हे सुनाना था |
दिवाने खून मे उबल रही
रवानी को जताना था |

हर सुबह गाती थी
हर दिन इक नया तराना |
हर फिजा को पसंद था
उसके दामन मे मचलना |

उसकी जुल्फोंकी घटा थी
बारीश की हर इक बुंद की चाहत |
या खुदा, तू भी कितना जालीम है
गम का साया दिया मुझे प्यार की बदौलत |

उन हसीन लबोने
इश्क का ऐतबार किया था |
भीगी भीगी आंखोंसे
इकरार - ए - पैगाम किया था |

जिससे था जनमोका नाता
उसे खुदी के पास रख लिया |
मोहब्बत के आगाज को कुदरत ने
मौत का अंजाम बना दिया |

Saturday, August 20, 2011

देवा..काय रे तुझी करणी..!!..

एक माणूस....मनात बसतो बघताक्षणी
च्यायला..!!..काय माणूस आहे..!!..
तोच माणूस....पचकन थुंकतो पुढच्याक्षणी
च्यायला..!!..काय माणूस आहे..!!..

एक मुलगी....छेडते मनाची तार
काय मुलगी आहे यार..!!..
तोच "यार" सांगतो - खेळते म्हणे ती भावनांशी
काय मुलगी आहे यार..!!..

एक माणूस....रग्गड पैसा....आलिशान गाडी
काय राव श्रीमंती..!!..
एक माणूस....दीन दुबळा..मात्र दिलेर अन दर्यादिल
ही खरी श्रीमंती..!!..

एक माणूस....त्याची कविता उत्कट
भेटतात त्याला सगळे लोक उद्धट
एक माणूस....चोरलेलं साहित्य
त्याचाच उदो उदो ....टोलेजंग अगत्य..

एक माणूस....सूट..बूट..रुबाब
रोज हॉटेलात जाऊन शाही कबाब
एक माणूस....घर नाही..दार नाही..
रोज रस्त्यावरचा वडा-पाव..

एक माणूस....स्वच्छ शुद्ध आचार विचार
नोकरी नाही..किंमत नाही..
बसलाय घरी
बेरोजगार..

एक माणूस....बदमाश..लफंगा..
पण भ्रष्ट राजकारण्याचा ताईत..
मोठी नोकरी..मालदार पार्टी..
हिंडतो फिरतो ऐटीत..

एक मुलगी....नजाकतीचा दर्या..
देवा..आजपासून तुझीच मनधरणी..
तीच मुलगी....तिला कॅन्सर....वेळ कमी..
देवा..काय रे तुझी करणी..!!..

पापणी चिंब भिजलेली !

काय वाटले, उगाच हसलो
खिडकीपाशी जाऊन बसलो
पुनव चंद्रमा, रात्र सुंदर
समय अवेळी कातर कातर....

पडू लागला पाउस सरसर
मनास म्हंटले तू ही पाझर
शीळ रुमानी ही ओठांवर
मला बिलगली माझी दिलबर....

गालांवरती गुलाब लाली
कोमल काया सजलेली
नजर मजवर रोखलेली
पापणी चिंब भिजलेली....

Friday, July 15, 2011

सांज..!!..

साधारण दोन-अडीच तासांची निद्रा डोळ्यांच्या पापण्या्वरून पाण्याच्या मारलेल्या सपक्यांसोबत वाहून गेली अन मी रम्य अशा सायंकाळी मस्त वाफाळलेल्या उकळत्या चहा चे प्राशन करून जीव्हादेवीला तृप्त केले अन चालत निघालो..
श्री अरण्येश्वर देवालय - मोठा, शांत अन रम्य परिसर ! अरण्येश्वर (शंकर), विठोबा - रखुमाई , श्रीराम , हनुमंत , गणपती बाप्पा , कालभैरव अन श्री दत्त महाराज या सर्वांच वास्तव्य आहे या देवळात ! दर्शन आटोपलं. कट्ट्यावर दहा - एक मिनिट विसावल्यावर मी निघालो . देवळातून बाहेर पडलो.
रणरणत्या उन्हाच्या दिवसात आभाळात काळ्या ढगांनी तौबा गर्दी केली होती. वातावरण अगदीच romantic होत. आत्तापर्यंत रम्य वाटणारी संध्याकाळ आता एक "प्रेमवेडी सांज" झाली होती.

“नभांगणातल्या श्वेत अभ्रामागून येणारी रणरणती सोनेरी शलाका जेव्हा आल्हाददायक नारींग्या मध्ये रुपांतरीत होते तेव्हा या धरेच्या अंगणात अवतीर्ण होते ती - सांज !”

अन दिवसभर तापून निघालेल्या या धरतीवर आकाशातून पाण्याचा फवारा पडू लागला अन त्यात मी ही चिंब भिजलो . आणि असं सगळं वातावरण असताना काही ओळी स्फुरल्या शिवाय राहत नाहीत . अशावेळी खर तर आपलं प्रेमाचं माणूस जवळ असेल तर क्या बात है..!!.. ( प्रत्येकाजवळ प्रेमाच माणूस असतच. माझ्यासारखे तर बरेच असतील माझे मित्र - मैत्रिणी -“जिनके खयालोंमे सिर्फ अनदेखा - अनजाना चेहरा हर घडी हर वक्त आता है ” !—असो ).
दररोज अशीच संध्याकाळ जर प्रत्येकाच्या जीवनात आली तर प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास नव्या उमेदीने , नव्या उत्साहाने सुरु राहील यात शंका नाही . मानसिक ताण तर कुठल्या-कुठे पळून जाईल पत्ता लागणार नाही. तर त्या स्फुरलेल्या ओळींनीच लेखाचा शेवट करतो -

स्वप्नांच्या नभांगणात प्रीत जन्मली
धुंद गारव्यात अन पावसात न्हाली
प्रेमाच्या स्वप्नात सखे गुंतले मन हे वेडे
आसमंती मृदेचा गंध ओला शिंपडे
मेघ बरसला हा प्रेमाचा, अंग-अंग नाहवे
पावासातुनी पुकारतो मी ये जराशी माझ्यासवे
फिरे बेभान हा वारा सांगे प्रेमाचे गूज
यावीच नित्य अशी ही प्रेमवेडी सांज..!!..

Sunday, June 26, 2011

प्रेमाचा विजय असो ….!

प्रेम आहे रे माझं तुझ्यावर
माझ्याकडे प्रेमानं एकदा तरी बघ
आता सहन नाही होत मनाला
या कढत अश्रूंची धग

किती स्वप्न पाहिली होती !
तुझ्या - माझ्या सोबत लक्ष - लक्ष तारे
सोबत जगण्याची घेतली होती शपथ
इतक्यात च विसरलास सारे ?

घर असावं टुमदार छोटेखानी वाडा
मज राणीचे दागिने अन तुझा राजेशाही थाट
स्वप्न तुझी खुळ्यासारखी , बोललास जाता जाता
पण येशील तू परत नक्की , विश्वासान बघेन वाट

तुझ्या शिवाय जगण्याचा
फुका प्रयत्न केला
हसत होतो वरकरणी मात्र
आत जीव ढसाढसा रडला

हर एक श्वासागणिक
कंठ दाटून येतोय
ओघळणारा प्रत्येक अश्रू
फक्त तुलाच शोधतोय

तुझ्या स्वप्नांचा राजकुमार परत आलाय
राणी , मला माफ करशील ?

( मग ती आनंदाश्रूंना कुरवाळत त्याला म्हणते )

खात्री होती मला परत नक्की येशील
प्रेमा वरचा विश्वास कायम जागता ठेवशील ..