Saturday, March 26, 2011

आयुष्य - एक प्रवास

आयुष्य - एक प्रवास
एकीकडून एकीकडे एकानेच जाण्याचा

प्रवास - हसत हसत जगण्याचा
हसता हसता स्मरण्याचा
सारे दू:ख मागे सारून
पुन्हा नव्याने जगण्याचा

विधात्याने मांडलेला खेळ बघण्याचा
जमलच तर खेळण्याचा
या रंगमंचावर
आपली भूमिका जगण्याचा

ज्याने आनंद मिळतो ते करण्याचा
जे करतो त्यात आनंद मिळवण्याचा
भोवातालीच्या प्रत्येकात
चैतन्य शोधण्याचा

दिवसागणिक वृद्ध न होता समंजस होण्याचा
तरीही बालपण न सोडण्याचा
नजरेत भरुनही अनोळखी दिसण्याचा
तरीही नजरेत भरण्याचा

दुसर्यासाठी झटताना स्वार्थ न बघण्याचा
तरीही तत्वांशी एकनिष्ठ राहण्याचा
खटकले काही, तरी जाब न विचारण्याचा
पटले नाही काही, तरी समजुन घेण्याचा

मरत मरत जगण्यापेक्षा
मरतानाही जगण्याचा
प्रत्येकासाठी मर मर मरण्याचा
मेल्यावर्ती सर्वांनी हेवा करण्याचा

आयुष्याच्या संध्याकाळी एकांतपणा गाठण्याचा
जगलेल्या जीवनावर समाधान मानण्याचा
त्या विधात्याकडे प्रार्थना करण्याचा
पुन्हा हाच जन्म मागण्याचा

आयुष्य - एक प्रवास
एकीकडून एकीकडे एकानेच जाण्याचा

राधा..!

टीप : चालीवर लिहिलेली पहिली कविता....

माज्या संग येशील का तू
पिरमाच्या त्या गावा
जिथ राधे संग श्याम
वाजईतो पावा

राधा माझी तू ग रानी
मी ग तुझा कान्हा
संगतीनं गाऊ सखे
पिरतिच्या गं ताना

डोयीवरी पिरमाची
घागर तू घे ना
पाण्यावरी उमटे
गान राधा राधा..

कविता सुचते तेव्हा..!!..

कविता सुचते तेव्हा जाणीव होते मातीला
हा वेडा कवी आता पाउस पाडणार याची
तेव्हा मग ती ही बेहद्द खुश होते अन आनंदून हसते
त्या म्रुदगंधालाच कवी कडून मिळालेली ही उपमा असते- हसण्याची
शब्दांमधुन भावनांचा पाउस जेव्हा कोसळतो
तेव्हा कवी जरासा घाबरतो- माती एवढे आघात झेलू शकेल ?
तेव्हा मातीच खात्री देते
त्या भावना कधीही मातीत न मिसळण्याची
कोवळा सूर्यप्रकाश आसमंतात पसरतो
ही खूण च असते कदाचित, त्या भावना मातीत न मिसळल्याची
त्या भावानांनाही कदाचित कंटाला आला असेल बरसण्याचा
अन त्याही पाहत असतील वाट- नव्या दिवसाची..