Saturday, March 26, 2011

कविता सुचते तेव्हा..!!..

कविता सुचते तेव्हा जाणीव होते मातीला
हा वेडा कवी आता पाउस पाडणार याची
तेव्हा मग ती ही बेहद्द खुश होते अन आनंदून हसते
त्या म्रुदगंधालाच कवी कडून मिळालेली ही उपमा असते- हसण्याची
शब्दांमधुन भावनांचा पाउस जेव्हा कोसळतो
तेव्हा कवी जरासा घाबरतो- माती एवढे आघात झेलू शकेल ?
तेव्हा मातीच खात्री देते
त्या भावना कधीही मातीत न मिसळण्याची
कोवळा सूर्यप्रकाश आसमंतात पसरतो
ही खूण च असते कदाचित, त्या भावना मातीत न मिसळल्याची
त्या भावानांनाही कदाचित कंटाला आला असेल बरसण्याचा
अन त्याही पाहत असतील वाट- नव्या दिवसाची..

No comments:

Post a Comment