Monday, November 14, 2011

अस्तित्व !

कटो-यात शेवटचा तेलबिंदू आटेपर्यंत जळत राहणारी पणती
मिटत नाही तोवर मिणमिणत राहणारी
पाण्याचा टिपूस जरी पडला तरी शमणारा तो इवलुसा ज्योतभर उजेड
उजेडानच तिमिराला चिरडता येत हे ठासून सांगणारी....

किस्मत - बिस्मत असलीच कोणी
तर तिला पुढ्यात झुकवली पाहिजे
स्वत:च अस्तित्व सिद्ध करायला
अंतर्मनातील प्रेरणा कायम पेटती पाहिजे....

जीव वा पणती, काहीही असो
गरजेचं असतं संपेपर्यंत प्रकाशत राहणं
समुद्रात शिंपले अगणित असतील
पण कणखर मनगटात असतं
शिंपल्यातल्या रेतीच रुपांतर मोत्यामध्ये करणं....

No comments:

Post a Comment